उदगीर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मराठी साहित्याला जसा मोठा इतिहास आहे, तसाच इतिहास मराठी पत्रकारितेला असून या दोन्ही क्षेत्रातील मान्यवरांनी नेहमीच हातात हात घालून समाजाला समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने पाहिले राज्यस्तरीय पत्रकारांचे साहित्य संमेलन येथील राघूकुल मंगल कार्यालयात पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्रचिंचोलकर, स्वागताध्यक्ष राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, प्रेस फोटोग्राफर संयुक्त राष्ट्र प्रतिनिधी अभिजित गुज्जर, दिलीप गायकवाड, अनिल वाघमारे, सिध्देश्वर पाटील, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, राजा आदाटे मुंबई, सुरेश नाईकवाडे, बाळासाहेब पाटोदे, नरंिसंह घोणे यांची उपस्थिती होती.
एस. एम.देशमुख यांनी समाजातील प्रश्न मांडण्याचे काम पत्रकारांचे असताना आज घडीला पत्रकार लेपीचेपी भूमिका घेत आहेत अशी खंत व्यक्त करून सत्ताधारी चुकीचे काम करत असताना पत्रकार व साहित्यीकांनी त्याविरोधात भूमिका घ्यावी असे आवाहन एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले. स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे यांनी उदगीर शहरात मागच्या काही वर्षात होत असलेली विविध साहित्य संमेलन पाहता हे शहर साहित्य नगरी म्हणून नावारूपाला येत आहे याचा आपल्याला अभिमान आहे असे मत व्यक्त संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्रचिंचोलकर यांनी ग्रामीण भागातील प्रश्न समजून पत्रकारांनी सोडविण्यासाठी मोठे प्रयत्न केले असल्याचे सांगीतले.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राघूकुल मंगल कार्यालयापर्यंत ग्रंथंिदडी काढण्यात आली. संमेलनाच्या समारोपात उदगीर जिल्हा निर्मितीसह विविध ठरावांना मान्यता या साहत्यि संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती करण्यात यावी यासह अनेक ठराव मांडण्यात आले. सर्व ठरावांना टाळ्यांच्या गजरात मान्यता देण्यात आली. संमेलन यशस्वितेसाठी रंगकर्मी प्रतिष्ठनचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड, सचिन शिवशेट्टे, श्रीनिवास सोनी, सुनिल हवा पाटील, आर्जुन जाधव, सिद्धार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे, रसुल पठाण, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, विक्रम हालकीकर हणमंत केंद्रे यांनी प्रयत्न केले.