परभणी : परभणीतील संबर, आसोला, खळी येथील मंदिरे ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळे पर्यटकांना नेहमीच साद घालीत आली आहेत. या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीत मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता परभणी येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
परभणी जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून या स्थळांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी शिवसेना नेते भरोसे यांनी पर्यटन मंत्री देसाई यांची भेट घेऊन दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी परभणी मधील संबर येथील दत्तात्रय महादेव संस्थान मंदिर येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीड कोटी रुपये, आसोला येथील मारोती मंदिर एक कोटी व विठ्ठल रुखमाई मंदिर पन्नास लक्ष रुपये, खळी येथील खंडोबा मंदिर व तेल्या मारोती मंदिर परिसरामध्ये पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांसाठी दोन कोटी रुपये अशी एकूण ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
शिवसेना नेते भरोसे यांनी केलेल्या मागणीला पर्यटन मंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच निधी मंजूर होवून पर्यटन विकासाला चालणा मिळणार आहे. त्यामुळे याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.