27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीपरभणीत बंदला हिंसक वळण

परभणीत बंदला हिंसक वळण

जाळपोळीसह पोलिसांवर दगडफेक, अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या

परभणी / प्रतिनिधी
परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटबंना झाल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजबांधवांनी पुकारलेल्या आजच्या जिल्हा बंदला हिंसक वळन लागले. सकाळपासूनच रस्त्यावरून मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव रस्त्यावर आले होते. यावेळी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांसह दुकानाच्या शटरवर दगडफेक करीत जाळपोळ करण्यात आली. दरम्यान संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्यानंतर पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत परभणीत तणावपुर्व वातावरण होते.


परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृृती पुतळा परिसरात मंगळवार दि. १० रोजी एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतिमेची विटबंना केली. त्याच वेळी उपस्थितांनी संबंधीताला ताब्यात घेत चांगलाच चोप दिल्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाज बांधवांनी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाने जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध केला.

दरम्यान काही संतप्त जमावाकडून शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची मोडतोड करण्यास सुरूवात करीत दुचाकी जाळ्याचा प्रकारही घडला. तसेच दुकानावरील पाट्यांची व शटरची तोडफोड केली. जागोजागी पोलिस तैनात असतांनाही या संतप्त जमावाने जोरदार दगडफेक केली.

शहरातील स्टेशनरोड, गुजरी बाजार, सराफा बाजार, गांधी पार्क, डॉक्टर लेन, बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर तसेच वसमतरोडवरही जोरदार दगडफेकीचे प्रकार केले. स्टेशन रोडवर संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्यानंतर पोलिसांनीही जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमाव अधिकच आक्रमक होवून महिला व पुरूषांनी पोलिसांवरच जोरदार दगडफेक केली.

यावेळी स्टेशनरोडवरील काही दुकानांना आग लावण्याचा प्रकारही घडला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक शहाजी उमाप हे परभणीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दुपारी चारनंतर रस्त्यावर उतरत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान सकाळपासूच अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड, मोंठ्याचे पोलिस निरिक्षक शरद मरे, नानलपेठचे अनिरूध्द काकडे, कोतवाली संजय ननवरे, ग्रामीणचे श्रीकांत डोंगरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR