परभणी : परभणी शहरातील ग्रामीण पोलिस ठाण्यातील दूरध्वनी मागील कित्येक वर्षांपासून बंद होता. या दूरध्वनीचे थकीत बिल भरून नागरीकांसाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून अनेक वर्षानंतर दूरध्वनीची बेल वाजल्याने पोलिस कर्मचा-यांतही समाधान व्यक्त होत आहे. यासाठी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी पुढाकार घेतला असून नागरीकांतही समाधान व्यक्त होत आहे.
परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात काही महिन्यापुर्वी रूजू झालेले पोलिस निरीक्षक डोंगरे यांना लँडलाईन दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे समजताच त्यांनी हा दूरध्वनी सुरू करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला. १९ हजाराचे थकीत बिल भरणा करून दूरध्वनी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
मुख्य म्हणजे जुनाचा दूरध्वनी क्रमांक फायबर केबलमध्ये कनव्हर्ट करून इंटरनेट सुविधेसह या ठिकाणचा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत समस्या असणा-या नागरीकांनी ०२४५२ २२०६३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक डोंगरे यांनी केले आहे.