26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरपर्यावरणाचा जागर घालणारी कविता : प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील

पर्यावरणाचा जागर घालणारी कविता : प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील

लातूर : प्रतिनिधी
अ‍ॅड. हाशम पटेलांची कविता चिंतनातून प्रकटते एखाद्या विषयाचे वेड निर्माण झाले की, मनुष्य त्या दृष्टीने विचार आणि चिंतन करू लागतो. त्या चिंतनाला शब्दरूप दिले की उत्तम कविता होते. या चिंतनातून ते पर्यावरणाचा जागर घालतात. मराठीत पर्यावरणावर मोजकी कविता असून हाशम पटेल यांनी ती उणीव भरून काढली आहे. माळीण दुर्घटनेत एका रात्रीत गावच गायब होते हा निसर्गाचा कोप नसून मानवी प्रवृत्तीचा कोप आहे. खडी-मुरूमासाठी डोंगर चिरून पृथ्वीचा विध्वंस केला जातोय, यातून जीवसृष्टी धोक्यात आली आहे. अशावेळी ही कविता पर्यावरणाचा जागर घालते असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अ‍ॅड.हाशम पटेल लिखित ‘विश्वाचा अर्थ गहिवर’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने अ‍ॅड. हाशिम पटेल यांच्या विश्वाचा अर्थ गहिवर या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा काल भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृह लातूर येथे सायं. साडेपाच वाजता घेण्यात आला. संत तुकारामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते, प्रमुख पाहुणे व भाष्यकार प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. श्रीपाल सबणीस, प्रा. फ. म. शहाजिंदे व प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, विलास सिंदगीकर,डॉ. जयद्रथ जाधव, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे व इस्माईल शेख आणि कवी अ‍ॅड हाशम पटेल उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांना भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, सातारा ‘फुले-आंबेडकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.श्रीपाल सबणीस यांनी विश्वाचा आर्त गहिवर मधील कविता वैश्विक जाणिवेची सत्यनिष्ठ कविता आहे. सर्व धर्मियांच्या मूल्यांपेक्षा पृथ्वीसंरक्षणाचा जागर महत्त्वाचा आहे. पृथ्वी शिल्लक राहिली तर माणूस आणि धर्म शिल्लक राहिल. परंतु स्वार्थी राज्यकर्त्यांशी हातमिळवणी करून डोंगर माफिया डोंगरांचा विनाश करत आहेत. सृष्टीची संवेदनशीलता, दु:ख समजून घेणे म्हणजे ,अखंड मानवजातीला समजून घेण्यासारखे आहे.
विश्वशांतीचा विचार सर्वच धर्म प्रमुखांनी डोंगरावरचिंतन करून दिला, परंतु आज त्याचाच विनाश करून त्यालाच विकास समजत आहेत. असे या कवितेच्या संदर्भात परखड भाष्य केले. प्रमुख पाहुणे प्रा.फ.म.शहाजिंदे म्हणाले की, ही कविता अंत:करणातून डोंगरांचा आक्रोश मांडते. या कवितेतून दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधले आहे. यावेळी प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी संयम, चिंतनशील मनुष्य जगाच्या कल्याणाचा विचार करतो. साहित्याचं काम समाजातली गढूळता दूर करणे आहे. ही कविता जगाचे हित जपते असे सांगितले तर अध्यक्षीय समारोप भाषणात डॉ शेषराव मोहिते यांनी अ‍ॅड. हाशम पटेल विचारपूर्वक पर्यावरण विषय कवितेतून व्यक्त करतात. संवेदनशील माणूसच निसर्गाचा विचार करतो. पण काही माणसात आदिम रानटीपणा आहे ते एकूण निसर्ग चक्र व जीवसृष्टचं चक्र बिघडतात.
        विश्वाचा आर्त गहिवर या कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर अ‍ॅड. हाशम पटेल यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगतात ते म्हणाले की, राजरोस डोंगरांचा विनाश पाहून मी व्यतीत झालो. माझ्या मनाला अतिव दु:ख देणारी ही घटना मी कवितेतून व्यक्त केली आहे या पर्यावरण कवितेमुळे समाजाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे हीच अपेक्षा आहे. प्रास्ताविक मसाप शाखाध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. प्रास्ताविकातून सर्व पाहुण्यांचा परिचय व लातूर मसाप शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. आणि अ‍ॅड. हाशम पटेल यांची कविता पर्यावरणाच्या जागतिक प्रश्नांवर चिंतन अत्यंत साध्या-सोप्या व सरळ भाषेत मांडते. या कवितेला पर्यावरण संरक्षणाचे मूल्य असल्याचे सांगितले.
या प्रकाशन सोहळ्याला मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. किरण सगर, डॉ. भास्कर बढे, अ‍ॅड. शरद इंगळे, प्रा. एम. आर. मुल्ला, अ‍ॅड. जहिरोद्दिन सय्यद, शेख शफी बोल्डेकर, डॉ. आर. बी. कसबे, योगीराज माने, विवेक सौताडेकर, प्रकाश घादगिने, नरसिंग इंगळे, डॉ. ज्ञानदेव राऊत, गोविंद जाधव, मोहीम कादरी, द. मा. माने, डॉ. संजय खाडप, जी. जी. कांबळे, व्यंकटेश काकनाटे, पांडुरंग अडसुळे, दिलीप अरळीकर, संजय जमदाडे, सुरेश गीर सागर, अ‍ॅड. सुरवसे शशिकांत, वृषाली पाटील, उषा भोसले, सुनीता मोरे, सविता धर्माधिकारी, पुरूषोत्तम जोशी, राजेंद्र माळी, रमेश हनुमंते, अ‍ॅड. शिंदे, प्रदीप हंगरगेकर, दिलीप गायकवाड, सतीश सुरवसे, डॉ. नंदकुमार माने, तहसीन सय्यद, रिजवान पटेल, साहेबांनी सौदागर, जयराज कसबे, इम्रान पटेल, सचिन जाधव, अब्दुल्ला शेख अनवर पठाण आणि लातूर व औसा विधिज्ञ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याचे उत्तम सूत्रसंचालन कवयित्री सौ. शैलजा कारंडे यांनी केले तर आभार मसाप शाखा सचिव डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR