25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपाऊस पुन्हा सक्रीय होणार!

पाऊस पुन्हा सक्रीय होणार!

शनिवारपासून धुंवाधार पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा अ‍ॅक्टीव्ह मोडवर येणार आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारपासून पुन्हा धुंवाधार पावसाचा इशारा दिला असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत व मराठवाड्यातही दिसून येणार आहे. १८ व १९ सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खान्देशात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता आहे तर गुरुवारी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे.

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस?
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR