25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकच्या हवाई हद्दीत ४६ मिनीटे मोदींचे विमान; पाकमध्ये खळबळ

पाकच्या हवाई हद्दीत ४६ मिनीटे मोदींचे विमान; पाकमध्ये खळबळ

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पोलंड दौ-याहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी मीडिया हाऊस डॉनने तेथील नागरी विमान प्राधिकरणाच्या अधिका-याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे, रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी ४६ मिनिटे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात होते.

मोदी यांचे विमान लाहोर आणि इस्लामाबादमार्गे अमृतसरला पोहोचले. जिओ न्यूजनुसार, त्यांचे विमान सकाळी १०.१५ वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाले आणि सकाळी ११.०१ पर्यंत तिथेच राहिले. याबाबत भारताने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद केली होती. भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे.

मार्चमध्ये पाकिस्तानने हवाई क्षेत्र अंशत: उघडले पण भारतीय उड्डाणांसाठी ते मर्यादित ठेवले. डॉनने असा दावाही केला आहे की, २०१९ मध्ये भारताने पंतप्रधान मोदींच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. काश्मीर वादामुळे ते पाकिस्तानने फेटाळले होते. पंतप्रधान मोदींच्या विमानाला जर्मनीला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीची गरज होती. मात्र, दोन वर्षांनंतर पाकिस्तानने मोदींच्या नॉन-स्टॉप विमानाला अमेरिकेच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी दिली.

डॉनशी बोलताना पाकिस्तानी अधिका-याने सांगितले की, मोदी भारतात पोहोचताच त्यांचे टीकाकार आमची हवाई हद्द वापरल्याबद्दल त्यांची कोंडी करू शकतात. त्याचवेळी डॉनने मोदींनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे हे दोन्ही देशांमधील संबंधांसाठी चांगले संकेत मानले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR