22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरपाचव्या फेरीअखेर आमदार सातपुते सहा हजार ३१४ मतांनी पुढे

पाचव्या फेरीअखेर आमदार सातपुते सहा हजार ३१४ मतांनी पुढे

सोलापूर : ‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असूनआतापर्यंत पाच फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण एक लाख ४२ हजार ७०० मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एक लाख ३६ हजार ३८६ मते पडली आहेत. पहिल्या फेरीत ‘नोटा’ला १८१ तर दुसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २६८ मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर आमदार सातपुते सहा हजार ३१४ मतांनी पुढे आहेत.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा. अर्जुन ओव्होळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, अशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमुर्ती भंते, रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन मस्के, सुनीलकुमार शिंदे, प्रा गायकवाड, शिवाजी सोनवणे हे देखील मैदानात आहेत. माढा मतदारसंघात धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जोरदार फाईट सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR