27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरपाच वर्षांत केलेल्या कामावर जनतेने आशीर्वाद द्यावेत 

पाच वर्षांत केलेल्या कामावर जनतेने आशीर्वाद द्यावेत 

औसा  :  प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांतून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असताना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे पूर्ण केली असून  विकासाच्या रुपाने मी जनतेला भरभरून दिले आहे. आता जनतेच्या आशीर्वादाची मला गरज असून २५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरताना मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आशीर्वाद द्यावा असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
  औसा विधानसभा मतदारसंघ भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी  काँग्रेस – रिपाइं – रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा (दि.२२) ऑक्टोबर रोजी औसा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे उपस्थित होते. यावेळी आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे पूर्ण होत आहेत. किल्लारी साखर कारखाना, भूकंपग्रस्ताचे प्रश्न, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील, एमआयडीसी, शेतरस्ते, रस्ते विकास विषय मार्गी लावता आले.
महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी युती धर्म पाळत विकासाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज परसने यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR