नळेगाव : वार्ताहर
नळेगाव परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून खरीप हंगामातील नगदी पिके असलेले सोयाबीन, तूर, तीळ, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी जून महिना उजाडण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी होता. मृग नक्षत्रामध्ये पेरणी होत असल्याने शेतक-यांनी सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर पिकाची पेरणी केली. सध्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकातील आंतर मशागत होऊ शकली नाहीकिंवा पिकात तण वाढू नये यासाठी वापरण्यात येत असलेले तणनाशकही फवारता आले नाही. पिकात तणानी जोर केल्याने पीक खाली व तण वर अशी परिस्थीती आहे. काही शेतक-यांना रानातील पाणी बाहेर न गेल्याने पिकात पाणी साचून पिके पिवळी पडली आहेत. या पावसाने सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शेतकरीचिं्ांतेत आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतक-यातून होत आहे.