निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पानंिचंचोली टोलनाक्यावरील रस्ता वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. याठिकाणी अनेक अपघात झाले असून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत होती. हा रस्ता तात्काळ मोकळा करण्यात यावा म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या व निलंगा वकील मंडळाच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र कार्यवाही होत नव्हती, अखेर पनंिचंचोलीचे माजी सरपंच श्रीकांत साळुंके यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्ता खुला केला आहे.
लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पानंिचचोली येथील टोल नाका दोन वर्षापासून वाहतुकीचा मोठा अडथळा ठरला होता. रस्ता अरुंद असल्याने अनेक अपघात होत होते मात्र सुस्तावलेल्या प्रशासनाने व संबंधित गुत्तेदारांने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दोन वर्षापासून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा रस्ता माजी सरपंच श्रीकांत साळुंके यांनी गावातील नागरिक व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्ता साफ करून वाहतुकीचा मार्ग खुला केला आहे.
यावेळी उपसरपंच बब्रुवान जाधव, युसुफ शेख, भगवान पाटील, शुभम जाधव, सुदर्शन जाधव , भगवान भांगे, इकबाल मुजावर, जलील शेख, मधुकर दिवे, पवन दिवे, अभिजित बंडगर ,मुकुंद बंडगर, समाधान पाटील, चाचा पाटील, देवा साबने , राहुल मोरे आदीसह नागरीक उपस्थित होते.