पालघर : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून ६३.९१% मतदान झालं आहे. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.
या लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.