वाढीव व्याजाचा ७ कोटींवर कर्मचा-यांना मिळणार लाभ
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्रालयाने पीएफवरील ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता पीएफवर ८.२५ टक्के व्याज मिळणार आहे.
फेब्रुवारीत ईपीएफओने २०२३-२४ वर्षासाठी ८.२५ टक्ेक व्याज देण्याची घोषणा केली होती. त्याला गुरुवारी अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली. ईपीएफओकडून याबाबत माहिती देण्यात आली. ईपीएफओबाबत निर्णय घेणा-या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (सीबीटी) फेब्रुवारी महिन्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत व्याजदरात वाढ करून तो ८.१५ वरून ८.२५ टक्के करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठविलाह्याहेता. त्यास मंजुरी मिळाली. पीएफधारकांना वर्षातून एकदाच म्हणजे ३१ मार्च रोजी पीएफवर व्याज दिले जाते.