22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपीएसआय परीक्षेत कळसकर प्रथम

पीएसआय परीक्षेत कळसकर प्रथम

एमपीएसचा निकाल जाहीर, मयुरी सावंत मुलीत पहिली
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर याने मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला तर मयुरी सावंत हिने मुलींमध्ये बाजी मारली. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेचा हा निकाल असून आयोगाच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. खेळाडू प्रवर्गातील निकाल वगळून हा निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर करताना अंतिम गुणतालिकाही जाहीर केली आहे. त्यामध्ये परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण देण्यात आले आहेत. पहिला क्रमांक पटकवलेल्या पुण्यातील अजय कळसकर या उमेदवाराला परीक्षेत ३०५.५० आणि मुलाखतीतील २४ असे एकूण ३२९.५० गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

खेळाडू प्रवर्गामध्ये निकाल राखून
पोलिस निरीक्षक पदासाठी ६ जुलै आणि १७ जुलै २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये खेळाडू प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची पडताळणी आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू प्रवर्ग सोडून उर्वरित ९५८ पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR