22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुढच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे ‘मुख्यमंत्री’ असतील; अंबादास दानवे

पुढच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे ‘मुख्यमंत्री’ असतील; अंबादास दानवे

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अनेक नेत्यांनी त्यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली असून महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत का, असा सवाल देखील सर्वांना पडला आहे.

अंबादास दानवे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. दानवे म्हणाले, येणारे वर्ष विधानसभा निवडणुकीचे आहे. यावेळेस महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे. पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा आम्हाला विश्वास आहे, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR