24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला

पुण्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओ समोर आला आहे.
पुण्यात कोयता हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याते चित्र आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओ समोर आला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या २ तरुणांनी पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खडक पोलिस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडाओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR