पुणे : देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कोयता गँग सक्रिय आहे. किरकोळ कारणांवरून कोयता हल्ले झाल्याच्या अनेक घटना पुणे शहरात घडल्या आहेत. आता त्यापुढे जाऊन गोळीबाराच्या घटनाही वाढल्या आहेत. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. आता पुन्हा गोळीबार झाला आहे.
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या भूमकर चौकात आज पहाटे अडीच वाजता गोळीबार झाला आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे.
देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कोयता गँग सक्रिय आहे. किरकोळ कारणांवरून कोयता हल्ले झाल्याच्या अनेक घटना पुणे शहरात घडल्या आहेत. आता त्यापुढे जाऊन गोळीबाराच्या घटनाही वाढल्या आहेत. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. आता पुन्हा गोळीबार झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या भूमकर चौकात आज पहाटे अडीच वाजता गोळीबार झाला आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे.
दोन घटनांनंतर तिसरी गोळीबाराची घटना
पुणे परिसरात काही महिन्यांपूर्वी कोयता हल्ले वाढले होते. कोयता गँगची दहशत निर्माण झाली होती. किरकोळ कारणांवरून हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोयता गँगविरोधात कठोर कारवाई सुरू केली. आता गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.