21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात बंद फ्लॅट फोडून किंमती ऐवज चोरला जात असून, डेक्कन, कोरेगांव पार्क, वडगाव शेरी तसचे हडपसर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी तब्बल १० लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आदित्य तापडीया (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. दरम्यान, ते दोन दिवसांपुर्वी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बाथरूमच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला. तसेच, घरातील बेडरूममधील कपाटातून १ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. तक्रारदार शनिवारी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

यासोबतच हडपसर भागातील पापडे वस्ती परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रितेश भीमरावजी पिसे (वय ३७) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच, वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात फ्लॅट फोडत ५ लाख ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. तर, दुस-या घटनेत गणेशनगर भागातील एका सदनिकेतून चोरट्याने मोबाइल आणि अंगठी असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR