22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात ‘महापूर’

पुण्यात ‘महापूर’

भिडे पूल पाण्याखाली, खडकवासलातून विसर्ग वाढला

पुणे : पुण्यात मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेक ठिकाणी अचानक पाणी पातळी वाढली. घरांमध्ये पाणी शिरले असून काही ठिकाणी पुराने वेढलेल्या पाण्यात लोक घरांमध्ये अडकले आहेत.
त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील शाळांना सुट्या देण्यात आल्या आहे
त. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितला देवी मंदिर, डेक्कन, संगम पूलसमोरील वस्ती, कॉर्पोरेशनजवळील पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही केले आहे. खडकवासला धरणातून ३५ हजार ५७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाची संततधार सुरूच राहिली तर यात वाढ केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल झाले असून जिल्ह्यातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR