29.9 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरपे अँड पार्क आणि टेंडर वसुलीच्या प्रतीचे ‘दहन’

पे अँड पार्क आणि टेंडर वसुलीच्या प्रतीचे ‘दहन’

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील आणि गंजगोलाईतील पथविक्रेते आणि हातगाडे व्यावसायिकांना उठवून त्यांच्या पोटावर ‘संक्रांत’ आणणा-या लातूर शहर महापालिकेच्या पे अँड पार्कच्या विरोधात पथविक्रेते, हॉकर्स यांच्यांकडून वसुली टेंडरचे दि . २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गंजगोलाई येथे  ‘दहन’ आंदोलन करुन निषेध करण्यात आला.  गंजगोलाई व लातूर शहरतील हातगाडेवाले आणि पथविक्रेत्यांबाबत दि. २४ डिसेंबर २०२४ रासेजी मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.. परंतु त्याला कसलाच प्रतिसाद मनपाने दिला नाही. त्यामुळे दि. ३ जानरेवारी रोजी मनपावर मोर्चा काढण्यात आला.  परंतू, मनपाने कसलाच विचार  केला नाही.
दि. ९ जानेवारी रोजी गंजगोलाईत धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु महापालिका मनमानी कारभार करुन पथविक्रेते व हॉकर्सवाल्यांवर कार्यवाही करीत आहे. त्यामुळे पे अँड पार्क  वसुली टेंडरच्या  विरोधात मंगळवारी आंदोलन करण्यात आले.  ‘पे अँड पार्क’ आणि वसुली टेंडर रद्द करावे, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले.  या आंदोलनात मोहसीन खान, शादूल शेख, आयुब शेख, जब्बार बागवान, इरफान शेख, अ‍ॅड. मुहंमदअली शेख, मुजीब हमदुले, असलम शेख, मुश्ताक सौदागर, शेख युूनूस, उमर शेख, राणी  कांबळे, आकाश कांबळे, सुनंदा  गोरे, बळी गोरे आदी सहभागी झाले होत.े

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR