22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमुख्य बातम्यापॉपकॉर्न ते जुन्या कारपर्यंत केंद्राचा ‘जीएसटी’चा मारा

पॉपकॉर्न ते जुन्या कारपर्यंत केंद्राचा ‘जीएसटी’चा मारा

 

जैसलमेर : वृत्तसंस्था
राजस्थानमधील जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची ५५वीं बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. यामध्ये जीएसटी दराबाबत फेरविचार झाला. तर काही वस्तूंवरील जीएसटी कायम ठेवण्यात आला. काही वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे.

एकीकडे कर्जावरील व्याज दरात कपात होत नसताना मोदी सरकारने पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकला. विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला सुद्धा जीएसटी परिषदेने वाटण्याच्या अक्षता लावल्याने देशभरात नाराजीचा सूर आळवला गेला.

फोर्टिफाईड तांदळावरील कर रचना परिषदेने अजून सुटसुटीत केली. जीएसटी परिषदेने त्यावर ५% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा वापर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी होत असेल तरी रेडी टू इट पॉपकॉर्नवर कर द्यावा लागणार आहे. साधे पॉपकॉर्न ते मसाला पॉपकॉर्न, पॅकेज्ड अथवा लेबल लावलेले नसतील तर त्यावर ५% जीएसटी मोजावा लागणार आहे. तर पॅकेज्ड आणि लेबल लावलेल्या पॉपकॉर्नसाठी १२% जीएसटी द्यावा लागणार आहे. तर साखर आणि कॅरमेलपासून तयार पॉपकॉर्नसाठी सर्वाधिक १८% जीएसटी मोजावा लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR