27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्यापोलिसांवर दगडफेक; हाजी शहजादच्या २० कोटीच्या महालावर फिरला बुलडोझर

पोलिसांवर दगडफेक; हाजी शहजादच्या २० कोटीच्या महालावर फिरला बुलडोझर

छतरपूर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील शहजाद अली याचे नाव चर्चेत आले आहे. त्याच्या २० कोटींचा आलिशान महालावर बुलडोजर चालविण्यात आले आहे. या हाजी शहजाद अलीने पोलिसांवर दगडफेक केली होती. परिवारासह फरार असलेला शहजादच्या घर आणि गाड्यांवर बुलडोजर चालविल्यानंतर पोलीस आता त्याच्या शोधात आहेत.

हाजी शहजादा याच्या तीन महाग गाड्या फॉर्च्यूनर, सफारी आणि स्कॉर्पियोवर सुद्धा बुलडोजर चालवले आहे. पोलिसांवरील दगडफेकीनंतर तो फरार आहे. या घटनेच्या २४ तासांत पोलिसांनी हाजी शहजादा याच्यावर कारवाई सुरु केली.

हाजी छतरपूर मुस्लिम बहुल भागात पंचायत लावत होता. त्याची दहशत इतकी होती की, त्याने दिलेल्या निर्णयाविरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. त्याच्या परवानगीशिवाय पोलीस ठाण्यात पाऊल ठेवणेही अशक्य होते. परिसरात त्याची भूमाफीया म्हणून ओळख होती. छतरपूर येथील अनेक जणांच्या जमिनीवर त्याने ताबा मिळवला होता. त्याच्या विरोधात पोलिसांकडे जाण्याचे धाडस कोणीही करु शकत नव्हता. त्या संपूर्ण परिसरात त्याच्या परवानगीशिवाय वाळू, जमीन, टायर आणि ऑईलचे कामकाज होऊ शकत नव्हते. कारण त्याचा चार भावांचा संपूर्ण परिवार या कामांमध्ये सहभागी होता.

शहजादा याचा मोठा भाऊ आजाद अली काँग्रेस नेता आहे. तिसरा भाऊ वाळू माफिया तर चौथ्याचे टायर आणि ऑयल व्यवसायावर कब्जा आहे. मध्य प्रदेशात २०१८ ते २०२० दरम्यान काँग्रेस सरकार असताना त्याची गुंडगिरी वाढली होती. आता मोहन यादव यांच्या सरकारने त्याचा २० कोटीचा महाल मातीत मिसळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR