लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी या परिक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिका-यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. यात परीक्षेत्रातील ६० पोलीस उपनिरीक्षक, २४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व १६ पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यातून दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत. नादेड परीक्षेमध्ये लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातून दहा पोलीस उपनिरीक्षक येत आहेत. लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे, प्रभाकर अंधोरीकर, जिलानी मानुल्ला, मुस्तफा परकोटे, विशाल सूर्यवंशी, श्रीमती पूनम मोहनराव सूर्यवंशी, मुजाहिद शेख यांची परभणी जिल्ह्यात तर सुमेध बनसोडे, अतुल डाके, श्रीमती सावित्रा रायपल्ले या पोलीस उपनिरीक्षकांची नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. त्यात बालाजी मोहिते परभणी, परमेश्वर कदम नांदेड, दीपककुमार वाघमारे परभणी, सुनील बिर्ला नांदेड, विष्णुकांत कुठे हिंगोली यांचा समावेश आहे. तर नांदेड येथून दत्तात्रय निकम, बिरप्पा भूसनूर, वसुंधरा बोरगावकर आणि परभणी येथून प्रदीप काकडे, हिंगोली येथून वैजनाथ मुंडे हे पोलीस निरीक्षक लातूर जिल्ह्यात येत आहेत. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ७ पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर जिल्ह्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यातून बदल्या करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये मुरुड येथे कार्यरत असलेले बाळासाहेब नरवटे नांदेड, नौशाद पठाण, बालाजी भंडे, रमाकांत नागरगोजे, बालाजी तोटेवाड, शिवप्रसाद कत्ते यांचा समावेश आहे. राजेश आलेवार, नरसिंह अनलदास, विशाल वाठोरे, शिवाजी देवकते, विशाल बाहत्तरे, अशोक उजगरे, भारती वाठारे हे ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर जिल्ह्यात येत आहेत.
निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी देखील लातूर जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यानुसार व्यंकटेश्वर आलेबार यांची मुरुड, विठ्ठल धुरपडे यांना औराद शहाजानी, बाळासाहेब डोंगरे यांची वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय, राहुलकुमार भोळ भादा पोलीस स्टेशन, क्रांती निर्मळे विवेकानंद चौक पोलीस स्टेशन आणि विश्वंभर पल्लेवाड स्थानिक गुन्हे शाखा याप्रमाणे या बदल्या करण्यात आल्या आहेत.