17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeसोलापूरप्रणिती शिंदे विजयी

प्रणिती शिंदे विजयी

सोलापूर : लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखला आहे. काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना ४ लाख ३३ हजार ३९२ मते मिळाली आहे. तर राम सातपुते यांना ३ लाख ६१ हजार ८६८ मते मिळाली. प्रणिती शिंदे यांचा ७१ हजार ५२४ मतांनी विजयी झाला आहे. आकडेवारी अपडेट होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दोन तगडे आमदार रिंगणात होते. गांधी घराण्याचे विश्वासू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे भाजपच्या या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रत्येक वेळी उमेदवार बदलण्याची परंपरा पुढे नेत भाजपने पुन्हा आमदार राम सातपुते यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यावर संधी दिली होती. दोघेही तरुण उमेदवार आहेत. एकीकडे वारसा जतन करण्याचे आव्हान होते तर दुसरीकडे किल्ला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान हो

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR