25.3 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeक्रीडाप्रणॉयला उपान्त्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का

प्रणॉयला उपान्त्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा अव्वल मानांकित एकेरी खेळाडू एच. एस. प्रणॉयला उपान्त्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले असून प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून १९-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. या सुपर ५०० स्पर्धेत भारताच्या कोणत्याही खेळाडूला उपान्त्यपूर्व फेरीच्या पलीकडे प्रगती करण्यात यश आले नाही. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयच्या पराभवापूर्वी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि महिला एकेरीत अकार्षी कश्यप याशिवाय सिक्की रेड्डी आणि बी सुमीथ रेड्डी या मिश्र जोडीला अंतिम आठमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

मिश्र दुहेरीत सुमित आणि सिक्की या आठव्या मानांकित पती-पत्नी जोडीलाही जियान झेन बँग आणि वेई या झिन या अव्वल मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला. बँग आणि शिन यांनी २१-१२, २१-१४ असा आरामात विजय नोंदवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR