कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारा नागपूर येथील कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोरटकरची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज संपली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले, तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटकेत असलेला कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला कोर्टात आणण्यात आले.
यावर तातडीने सुनावणी करत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकार पक्षाकडून पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे त्याचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.