18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रप्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या; महाराष्ट्र शासनाकडून पदोन्नतीचे आदेश

प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या; महाराष्ट्र शासनाकडून पदोन्नतीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर, महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरू करण्यात येत आहेत. प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही अधिका-यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने आज काही अधिका-यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. तर, काही अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.

सचिंद्र प्रताप सिंह यांची आयुक्त, शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्याक विभाग, मंत्रालय मुंबईच्या सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

रवींद्र बिनवडे हे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुंद्राक शुल्क, पुणे या पदावर काम करतील.

रणजितसिंह देओल यांची प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अशोक करंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे यांची सचिव व विशेष चौकशी अधिकारी (२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभाग, पुणेचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

सूरज मांढरे यांची आयुक्त कृषी, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.

प्रदीप पी. यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

माणिक गुरसाळ यांना सध्याच्याच पदावर ते पद अधिकालिक वेतनश्रेणीत उन्नत करून पुढे ठेवण्यात आले आहे. माणिक गुरसाळ यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

सोनिया सेठी सध्या महसूल व वन विभाग, मंत्रालय येथे प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन ) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियान, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.

शीतल तेली-उगले यांना सोलापूर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त पदावर वेतनश्रेणी उन्नत करून पदोन्नती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांना वेतनश्रेणी उन्नत करून पदोन्नती देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR