22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरप्रशासन व स्थानिक नागरिकांची कोअर कमिटी स्थापन होणार

प्रशासन व स्थानिक नागरिकांची कोअर कमिटी स्थापन होणार

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पानगाव ते खरोळा पाटी, बोरगाव ते मुरुड अकोला रस्ता या रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रशासन व स्थानिक नागरिकांची कोअर कमिटी स्थापन करुन पानगाव ते खरोळा पाटी रस्त्याच्या कामाला गती द्या. शेतक-यांची सहमती असलेल्या ठिकाणचे काम तात्काळ सुरु करा. बोरगाव-मुरुड अकोला रस्त्याच्या तांत्रिक अडचणी दूर करुन रस्त्याचा प्रश्न निकाली काढा, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक सोमवारी, दि. २६ रोजी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, रेणापूरच्या तहसीलदार मंजूषा भगत यांच्यासह कृषी, परिवहन आदी विभागांचे अधिकारी, विमा  कंपनीचे प्रतिनिधी व दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत उपस्थित होते. आमदार धिरज देशमुख म्हणाले, लातूर ग्रामीण मतदारसंघातील पानगाव ते खरोळा पाटी रस्त्याचे काम लवकरात लवकर होऊन दळणवळण सुरळीत व्हावे. स्थानिक नागरिक व प्रवाशांची गैरसोय थांबावी.  मी वेळोवेळी बैठका घेऊन यासाठी पाठपुरावा केला आहे. हा रस्ता अपुर्ण राहिल्यास आपल्या भागाचे दूरगामी नुकसान होत आहे. यासाठी हा रस्ता कामाच्या निश्चित कालमर्यादेत पुर्ण होणे गरजेचे
आहे.
प्रशासनाने स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधून रस्त्याचे काम पूर्ण करावे. लातूर – टेंभूर्णी महामार्गावरील बोरगाव ते मुरुड अकोला व मुरुड अकोला ते येडशी या रस्त्याच्या कामाचाही निर्णय तातडीने होणे गरजेचे आहे. रस्त्याची दुरवस्था, वाहतूक वर्दळ, स्थानिकांची मागणी व आंदोलन याचा विचार करून या रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रश्न मार्गी लावावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR