22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरप्रा. डॉ. प्रदीप देशमुख यांचा सेवा गौरव समारंभ उत्साहात

प्रा. डॉ. प्रदीप देशमुख यांचा सेवा गौरव समारंभ उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रदिप देशमुख हे ३४ वर्ष एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांनी क्रीडा क्षेत्रात महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले कार्य भुषणावह, गौरवशाली व वैभवसंपन्न असे होते. यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय पाटील होते तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुदर्शन मोरे, सत्कारमूर्ती डॉ. पी. एन. देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनीषाताई देशमुख तसेच डॉ. आशा मुंडे, डॉ. मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. कुमार बनसोडे, प्रा. पी. एन. जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. एन. देशमुख म्हणाले की,  एक क्रीडा शिक्षक म्हणून मी नेहमी आनंदात, रुबाबात, सुखात राहून माझ्या विद्यार्थ्यांना मी सर्वोत्तम खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या विद्यार्थ्यांनीही मला समजून घेऊन, त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणारे विद्यार्थी घडले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना डॉ. अजय पाटील म्हणाले की, एक क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून जाऊन महाविद्यालयाच्या  नावलौकिक वाढवला आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात ध्येयाने झपाटलेल्या डॉ. पी. एन. देशमुख यांची सेवा लक्षणीय व संस्मरणीय अशी राहिली आहे.
यावेळी डॉ. पी. एन. देशमुख व सौ. मनीषाताई देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सेवा गौरव प्रमाणपत्र, चांदीची गणेशाची मूर्ती देऊन   सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. कुमार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुरेखा बनकर यांनी केले तर आभार प्रा. जी. एस. देशमुख यांनी मानले.  या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR