लातूर : प्रतिनिधी
दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून प्रति वर्षा प्रमाणे याहीवर्षी दि. दोन फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनारायन मंगल कार्यालायात प्रतिष्ठानच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तिनां विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील भरीव कामाबदल प्रसिध्द लेखक प्रा. डॉ. वशिष्ट गणपत बन लातूर यांचा दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीच्या वतीने गोसावी समाजाचे नेते योगेश बन, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी, प्राचार्य विराट गिरी, योगेश गुलाबराव बन, सुरज गिरी, डॉ. पि. एल. भारती, बंडु पुरी, सुनिल भारती, अरुण गिरी, गणेश पुरी, ज्ञानेश्वर गिरी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रा. वशिष्ट बन यांना राज्य समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बदल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
………………………२०…………………………