25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeपरभणीप्रा. हाके यांच्या पाठींब्यासाठी ओबासींची निदर्शने

प्रा. हाके यांच्या पाठींब्यासाठी ओबासींची निदर्शने

गंगाखेड : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके आमरण ऊपोषणास बसले आहेत. त्यांनी अन्न व पाणी त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाने या ऊपोषणाची गंभीर दखल घ्यावी. ओबीसींच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर ऊतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा ईशारा गंगाखेड सकल ओबीसी सनाजाच्या वतीने निदर्शने करत देण्यात आला.

प्रा. हाके यांना पाठींबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने आज दि.१९ रोजी तहसील समोर निदर्शने करण्यात आली. राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भेदभाव करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ओबीसींना न्याय देवून ऊपोषण न सोडवल्यास गंगाखेड येथे विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा ईशारा राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. प्रा. हाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ओबीसी समाजाचे सर्वश्री गोविंद यादव, गोविंद लटपटे, साधना राठोड, लक्ष्मण लटपटे, जनार्दन परकड, गोविंद मानवतकर, नारायण घनवटे, प्रदीप मुंडे, राहुल फड, बालासाहेब यादव, सागर गोरे, हनुमान देवकते, मनोज मुरकुटे, माधवराव चव्हाण, सुभाषराव भोकरे, बाबुराव लटपटे, दाजीबा घनवटे, नारायण परकड, गजानन फड, दिनकर सोडगीर, नामदेव सोन्नर, अशोक रूपनर, साहेब हाके, डिगंबर यादव, ओमकेश लटपटे, नितीन नागरगोजे, महादेव फड, गोविंद दहीफळे, बाळासाहेब देवकते, दत्ता रूपनर, भास्कर शेंडगे, मुंजाभाऊ लांडे आदिंसह प्रमुख कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती. पोलीस निरीक्षक दिपक वाघमारे, ऊपनिरीक्षक बुधोडकर यांनी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR