17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाणार

फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाणार

नवाब मलिकांचा इशारा

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. असे असतानाच मलिकांनी थेट फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

कुणी कितीही मोठे असू द्या किंवा छोटे असू द्या. देवेंद्रजी पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितली नाही तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार आहे, असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा नवाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. नवाब मलिक कोणाला घाबरत नाही. आता आम्ही बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जाताय की यांचा जामीन रद्द करा. मला तुरुंगात टाका. आणखीन मला दहा-वीस हजार मते वाढतील. माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करतात, दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांच्या विरोधात मी तपासून नोटीस पाठवणार आहे. सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

योगींचे घाणेरडे राजकारण
योगी आदित्यनाथ यांनी ‘बेटेंगे तो कटेंगे’ असे विधान प्रचारसभेदरम्यान केले. यावर नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे, माझे विचार भाजपला जोडणार नाही. ‘बेटेंगे तो कटेंगे’ असे म्हणत आहेत. हे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. जितके घाणेरडे राजकारण होईल. तितक्याच खोलात ते जात राहतील, असे नवाब मलिक म्हणाले.

मानखुर्द शिवाजीनगरमध्ये तिरंगी लढत
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक आणि भाजपमधील वाद लपून राहिलेला नाही. नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी भाजपने अजित पवारांना वारंवार सांगितले. पण अजितदादांनी मलिकांना उमेदवारी दिली. मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबू आझमी तर शिवसेना शिंदे गटाने सुरेश कृष्ण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR