21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रफुलंब्रीत दुकानाला आग; ३ ठार, २ गंभीर

फुलंब्रीत दुकानाला आग; ३ ठार, २ गंभीर

फुलंब्री : प्रतिनिधी
येथील दरी फाटा येथे असलेल्या प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात शनिवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुलंब्री शहरात दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य भरलेले होते
शनिवारी रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला. आग लागल्याची माहिती दुकानमालक व शेजारी असलेल्या दुकानमालकांना समजली असता ते दुकान उघडण्यास धावले.

दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे तीन लोक वेगाने बाहेर फेकले गेले, यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीत होरपळले. यात नितीन रमेश नागरे (वय २५), गजानन वाघ (वय ३०), राजू सलीम पटेल (वय २५) या तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व फुलंब्री येथील रहिवासी होते. तर घटनेत शाहरूख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेतील मयत गजानन वाघ व जखमी शाहरूख पटेल हे दोघे चांगले मित्र होते. ते होमगार्डमध्ये आहेत. शाहरूख पटेल याचा मयत भाऊ राजू पटेल याचे दुकान असल्याने हे आग विझविण्याकरिता घटनास्थळी गेले होते. फुलंब्री पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR