22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरबंगळुरू-कलबुर्गी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय

बंगळुरू-कलबुर्गी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय

सोलापूर :
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वे बंगळुरू-कलबुर्गी-बंगळुरूदरम्यान आठवड्यातून तीन दिवस विशेष एक्स्प्रेस सोडणार आहे. या गाडीने सोलापूरकरांना बंगळुरूला जाण्यासाठी पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस व मुंबई एलटीटी- विशाखापट्टणम एक्स्प्रेस या गाडीने कलबुर्गीला जावे लागेल. तेथून या नव्या गाडीने जिल्ह्यातील प्रवाशांना थेट बंगळुरूला जाणे सोयीचे झाले आहे.

दरम्यान, या उन्हाळी विशेष गाड्यांच्या १५ फेऱ्या होणार आहेत. बंगळुरूहून २७ मे ते २७ जूनपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि गुरुवारी रात्री ११:५० वाजता ही गाडी सुटत आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० वाजता ती कलबुर्गी येथे पोहोचेल. २८ मे ते २८ जून दरम्यान दर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी संध्याकाळी ०४:५० वाजता कलबुर्गीहून गाडी निघेल. ती बेंगळुरूला दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:४५ वाजता पोहोचेल. या गाडीला येलहंका, धर्मावरम, अनंतपूर, गुंटकल, अडोनी, मंत्रालयम रोड, रायचूर, कृष्णा, यादगिरी, वाडी आणि शाहाबाद स्टेशनवर दोन्ही बाजूने थांबे असतील.

अनेकजण बंगळुरूला जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेस निवडतात. त्यामुळे उद्यानला मोठी गर्दी असते. आता थेट कलबुर्गीहुन आठवड्यातून तीन दिवस गाडी धावणार असल्याने सोलापूरकरांना बंगळुरूला जाण्यासाठी चांगला पर्याय मिळाला आहे. शिवाय उद्यान एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
बिदर-एसएमव्हीटी बंगळुरू आठवड्यातुन तीनदा व कलबुर्गी-एसएमव्हीटी बंगळुरू आठवड्यातून तीनदा ही रेल्वेगाडी सुरू झाली आहे. त्यामुळे उद्यान एक्सप्रेसवरील ताण कमी होणार आहे. वेटींग मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

कलबुर्गीला जाण्यासाठी सोलापूर स्थानकावरून रोज भरपूर गाड्या सुटतात; मात्र कलबुर्गी ते बंगळुरू ही गाडी पकडण्यासाठी सकाळी ९.१५ वाजता सोलापूरहून कलबुर्गीला जाणारी पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस व मुंबई एलटीटी विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही दुपारी १.५५ वाजता आहे. त्यामुळे शताब्दी आणि विशाखापट्टणम एक्स्प्रेसने कलबुर्गीला जाणे उचित ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR