26.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरबदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला उतरल्या रस्त्यावर

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला उतरल्या रस्त्यावर

लातूर : प्रतिनिधी
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेने संपुर्ण देश हादरुन गेला  आहे. देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. लातूर शहर जिल्हा महीला काँग्रेस व लातूर तालुका महीला काँग्रेसच्या  दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन करुन आरोपीस कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बदलापुरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालकांनी याबाबत खोलवर चौकशी केली आणि भयंकर प्रकार समोर आला. हा प्रकार घडल्याच समोर आल्यानंतर पोलीसाकडे तक्रार करण्यासाठी पालकांनी पोलीस स्टेशन गाठल, मात्र त्यांची लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी तब्बल १२ तास लावले.  शाळा प्रशासनानेही या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल. यासर्व प्रकरणात आणि महीला सुरक्षीतता बाबत सरकारची मोठी अनास्था, बेजबाबदारपणा दिसून आला आहे. या घटनेचा निषेध करणा-या महीला पत्रकारावर सत्तेतील काही मंडळीनी बेजबाबदार वक्तव्य केली आहेत, या सर्व प्रकाराचा निषेध करुन, महाराष्ट्रात महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. सरकारने याकडे गांभीरपणे लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी करणारे निवेदन लातूर शहर जिल्हा महीला काँग्रेस व लातूर तालुका महीला काँग्रेसच्या वतीले तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात महिला, मुली सुरक्षित नाहीत, अशा अनेक घटना रोज घडत आहेत. महिला व मुलीवरील त्याच्याराच्या घटनेने महाराष्ट्राची पुरती बदनामी झालेली असून देशात महाराष्ट्र महिला, मुलीवरील अत्याचारात क्रमांक १ चे राज्य झाले आहे, की काय असे वाटत आहे. महाराष्ट्राचे शासन, मुख्यमंत्री व गृहमंत्री यावर उपाय योजना करायचे सोडून बेजबाबदारपणाचे वक्तव्य  करीत आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे महिलात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झालेली आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपीवर तात्काळ खटला चालवून शिक्षा झाली पाहिजे. सर्व शाळा महाविद्यालयात मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापून मुलींचे संरक्षण झाले पाहिजे, लहान मुलींचे सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा नेमली पाहिजे,  या सर्व उपाय योजना शासनस्तरावरुन राबविणे आवश्यक आहे. मात्र शासनातील मंत्री, पदाधिकारी वातावरण खराब करीत आहेत. अत्याचार झालेल्या मुली, महिलांना व त्यांचे कुटुंबाना आधार द्यायचा, मदत करायचे सोडून त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वक्तव्य करीत आहेत. आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने याचा निषेध करीत आहोत, असे यावेळी सांगण्यात आले.
यानिवेदनाद्वारे बदलापूर व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी महिला, मुलीवरील अत्याचारी लोकांवर तात्काळ कार्यवाही करावी, पिडीत कुंटुबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर माजी महापौर लातूर शहर जिल्हा महीला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता खानापूरे, लातूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा दैवशाला राजमाने, प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील, तालुका अध्यक्षा उषा चौंडे, सुनिता स्वामी सविता चौंडे, सुलेखा कारेपूरकर, संगीता ब्याळे, लक्ष्मी बटनपूरकर, शमशाद शेख, शिला वाघमारे, फातिमा पठाण, सुनंदा कांबळे, सुनिता एम.डांगे, पुजा पंचाक्षरी, अ‍ॅड. सुनंदा इंगळे, सरोज डिग्रसे, सायरा पठाण, शहनाज बागवान, कांता कांबळे, महीला पदाधिकारी, कार्यकर्त्या यांच्यासह तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, शहराध्यक्ष इम्रान सय्यद, प्रवीण कांबळे, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, कलीम शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR