22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडबस वाहकास मारहाण; कंधार पोलिसात गुन्हा दाखल

बस वाहकास मारहाण; कंधार पोलिसात गुन्हा दाखल

कंधार : प्रतिनिधी

तालुक्यातील मसलगाव फाटा येथे मुखेड नांदेड जाणा-या एसटी बस वाहकास तिकिटाचे पैसे जास्तीचे मागतोस असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून कंधार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि २५ रोजी बुधवारी मुखेड आगारातून बस क्रमांक एम एच २० बी एल २२२८ एस टी बस प्रवासी घेऊन कवठा मसलगा मार्गे नांदेड येथे जात असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मसलगाव फाटा येथून बस मध्ये बसलेल्या प्रवासी योगेश नरवाडे आणि शिवाजी नरवाडेसह काही प्रवासी बसमध्ये चढले काही अंतरावर गेले असता वाहक नामदेव गोंिवद रायेवार यांनी प्रवाशास तिकिटाचे पैसे मागत असताना योगेश नरवाडे शिवाजी नरवाडे यांच्यासह इतर काही जणांनी तिकिटाचे भाडे जास्त मागत आहेत या कारणावरून वाद घालत बसमध्ये प्रवासी व वाहकात शाब्दीक चकमक झाली.

बाचाबाचीनंतर थापड बुक्क्यांनी मारहाण करत शिवगाळ केली या प्रकरणी नामदेव गोंिवद रायेवार वय ३१ वर्ष या वाहकाच्या तक्रारीवरून योगेश नरवाडे आणि शिवाजी नरवाडे यांच्यासह ईतर जणांवर कंधार पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी रात्री उशिरा बाराच्या सुमारास भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२३(१), ३५२ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गित्ते अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR