18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशात पुन्हा इस्कॉन मंदिरात तोडफोड, जाळपोळ

बांगलादेशात पुन्हा इस्कॉन मंदिरात तोडफोड, जाळपोळ

ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी रात्री (६ डिसेंबर) ढाक्यातील आणखी एका हिंदू मंदिरावर कट्टरवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कट्टरवाद्यांनी इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हा हल्ला केला.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वप्रथम मंदिरात तोडफोड करण्यात आली. यानंतर, जमावाने देवांच्या मूर्तींना आग लावली. या मंदिराचे व्यवस्थापन इस्कॉन करत होते. या हल्ल्यानंतर, पुन्हा एकदा हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत आणि मुहम्मद युनूस केवळ मूकदर्शक बनले आहेत.

कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी म्हटले आहे, मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली. आठवडाभरापूर्वी, मुस्लीम जमावाने इस्कॉन नमहट्टा केंद्र जबरदस्तीने बंद केले होते. चिन्मय कृष्ण दास प्रभू आणि त्यांच्या सहका-यांची नुकतीच झालेली अटक, इस्कॉन या हिंदू संघटनेवर बंदी घालण्याचा प्रयत्न आणि देशद्रोहाच्या खटल्यांद्वारे हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR