मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यामध्ये बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा मोठा प्रचार करण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी अर्जांची छाननी सुरू केली आहे.
मात्र एका बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत दुस-या देशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून ५ बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रं तयार करून या बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला आहे.
गेल्या महिन्या-दीड महिन्यात मुंबईत गुन्हे शाखेने जवळपास ३० हून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे ५० बांगलादेशी नागरिकांना आतापर्यंत अटक केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रं बनवून देण्यामध्ये ज्या एजंटने मदत केली, त्याच्याविरोधातही वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.