22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरबांधकाम मजुराचा मृत्यू; ओळख पटेना

बांधकाम मजुराचा मृत्यू; ओळख पटेना

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील एका बांधकामावर काम करीत असताना चक्कर आली म्हणून त्या बांधकाम मजुरास येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे ऐकीव नाव राकेश रेड्डी रा. मंगलोर (कर्नाटक) असे आहे. पण, अद्याप त्याची पूर्ण ओळख पटली नसून याचाबत कोणास ओळख पटल्यास संबंधीतांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर शहरातील साईबाबानगर भागात एक काँक्रीटचे काम चालू होते. या कामावर काम करीत असताना राकेश रेड्डी यास चक्कर आली.
तेंव्हा त्यास थोडावेळ बसू दिले व त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा त्या दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. काँक्रीटचे काम करणा-या यासीन मैनोद्दीन पठाण याने त्या बांधकाम मजुरास गोलाई येथून कामासाठी नेले होते. त्याचे नावही त्यास माहीत नव्हते.  अधिक चौकशी करत असताना दुस-याच कोणातरी ठेकेदाराने त्याचे नाव राकेश रेड्डी असल्याचे सांगितले. मात्र, त्याची दुसरी कोणतीही ओळख नाही. त्याचे जवळचे कोण नातेवाईक आहेत. नेमके त्याचे नाव राकेश रेड्डी आहे की अन्य, त्याचा पत्ता काय याबाचत कसलीही माहिती उपलब्ध झाली नाही.
त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून शासकीय रुग्णालयातील शीतगृहात त्याचे प्रेत ठेवण्यात आले आहे. ५ फूट २ इंच उंचीचा, अंगात काळ्या रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाचे अंडरविअर, कमरेला काळा कडदोरा, शरिराने मजबूत, डोक्यावर काळे केस, गोल चेहरा, सरळ नाक असे वर्णन आहे. त्याची ओळख पटल्यास संबंधीतांनी शिवाजीनगर पोलीस
ठाणे अथवा तपासीक अंमलदार मंगेश मुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR