लातूर : सिद्धेश्वर दाताळ
प्रकाशाचा उत्सव असलेला दीपावली अगदी उंबरठयावर येऊन ठेपली आहे. रोषणाईचे अतूट असे नाते असलेल्या हा सण प्रकाशाने उजळून काढण्यासाठी पारंपरिक आणि काही नवीन प्रकारातील आकर्षक आकाशकंदिल शहरातील मुख्य बाजारपेठ दाखल झाल्याने बाजारपेठ लखलखाट झाली आहे.
बाजारपेठेत विक्रीसाठी चांदणी, रॉटल करंजी, पेशवाई, भवरा, अनारवाले, वेलवॉट, यासह इकोफ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील बाजारात उपलब्ध असल्याचे होलसेल व्यापारी निरव शाह यांनी सांगितले आहे. दिपाळीच्या तयारासाठी सा-यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळीचा प्रकाशोत्सव सजविण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे आकर्षक असे आकाशकंदील दाखल झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह छ. शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोडवरील दुकानात विविध आकाराचे आकर्षक आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत. या वर्षी आकाश कंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी एकमतशी बोलताना सागीतले.
आकाशकंदीलांनी बाजारपेठेत रौनख आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत आकाशकंदीलांचा लखलखाट पाहायला मिळत आहे. आकाशकंदील विक्रीत्यांनी शहरात विविध ठिकानी असंख्य स्टॉलस लागले आहेत. प्रत्येक स्टॉलवर आकाशकंदलांचे दरही वेगवेगळे आहेत. सर्वात लहान आकाशकंदील ६० रुपये तर सर्वात मोठे १५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. काही ठिकाणी आकाशकंदील १५० रुपये ते १००० रुपये तर काही ठिकाणी २०० रुपये ते १४०० रुपयांपर्यंत आकाशकंदीलांच्या किंमती असून बाजारात त्यांची विक्री केली जात आहे.