22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबापरे! दुबईचे तापमान ६२ डिग्री पार...

बापरे! दुबईचे तापमान ६२ डिग्री पार…

 

दुबई : वृत्तसंस्था
येथील तापमानाचा पारा ६२ डिग्री सेल्सिअसच्या पार गेला आहे. १६ जुलै २०२४ रोजी दुपारी हे सर्वोच्च तापमान दुबई इंटरनॅशलन एअरपोर्टवर नोंदवले गेले आहे. म्हणजे तापमानाचा पारा १४४ फॅरनहाईटवर पोहचला होता. म्हणजेच ६२.४४ डिग्रीवर काटा पोहचला होता.

सायंकाळी ५ वाजता हे तापमान लागलीच खाली येत ५३.९ डिग्री सेल्सिअस झाले. परंतू हे तापमान सजिवांसाठी योग्य नाही. कोणताही सजीव अशा तापमानात तग धरु शकत नाही. वाळवंटी शहर दुबई का तापलं आहे. याविषयी आता चर्चा सुरु झाली आहे.

दुबईत अलिकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन अक्षरश: पूर आला होता. आता येथील तापमानाने उच्चांक गाठला आहे. एअर टेंपरेचर ४२ डिग्री सेल्सिअर होते. ‘ड्यू पाँईंट’ म्हणजेच आर्द्रता ८५ टक्के होती. त्यामुळे तापमान ६२.२२ डिग्रीवर पोहचले. म्हणजेच दुबईत वेट बल्ब टेंपरेचरचे वातावरण आहे.

दुबई येथून जवळील सौदीतील मक्केत उष्णतेच्या लाटेने एक हजार लोकांचा नुकताच मृत्यू झाला. यंदाचे वर्ष जगासाठी सर्वात उष्ण तापमानाचे वर्ष आहे. यामुळे संपूर्ण आखाताची कोंडी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR