25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरबाप-लेकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

बाप-लेकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील माळहिपरगा गावचे शेतकरी तिरुपती बाबुराव पवार वय ४२ वर्ष व त्यांचा मुलगा नामदेव तिरुपती पवार वय १२ यांचा  दि १७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.५० वाजताच्या दरम्यान पाझर तलाव क्र २ येथे त्यांच्या बैलाला तलावात धूत असताना अचानक ही दुर्देवी घटना घडली व बाप लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
  माळहिपरगा येथील तरुण शेतकरी तिरुपती बाबुराव पवार व त्यांचा मुलगा नामदेव तिरुपती पवार त्यांच्या बैलना धुण्यासाठी तलावात घेऊन गेले असताना अचानक बैल खोल पाण्यात गेले त्यांना बाहेर हकलण्याच्या प्रयत्नात  मुलगा नामदेव पवार पाण्यात बुडाला व त्याला वाचविण्याचा प्रयत्न त्याच्या वडिलांनी केले पण त्यात त्यांचा पण पाण्यात बुडून मृत्यू झाला हे वृत्त शेजारील शेतक-याच्या लक्षात येताच धाव पळ करून त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण दोघांचाही मृत्यू झाला.
 या प्रकरणी माळहीपरगा गावचे पोलीस पाटील धोंडीराम राठोड यांनी पोलीस ठाणे, जळकोट व माळहीपरगा सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना मोबाईल वरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.  तात्काळ  जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुंडे, तलाठी आकाश पवार व मंडळ अधिकारी कांबळे घटनास्थळी उपस्थित झाले. पंचनामा करून जळकोट येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शववच्छिेदन करून माळहीपरगा येथे मयत बाप लेकावर शोकाकुल वातावरणात एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
     मयत तिरुपती पवार हे त्यांच्या वडिलांना एकटेच होते तसेच मयत तिरुपती पवार यांना  चार मुली व एकच मुलगा होता. या दुर्देवी घटनेत बाप व मुलांचा मृत्यू झाल्याने या घरावर फार मोठे संकट कोसळले आहे. आता घरचा करता पुरुष व एकुलता एक मुलगा गेल्याने चार मुलींचा सांभाळ करण्यासाठी मयत तिरुपती पवार यांच्या पत्नीवर संकट उभे राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR