23.7 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeधाराशिवबाबळसुर येथे तिहेरी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

बाबळसुर येथे तिहेरी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

अमोल पाटील
उमरगा : लातूर येथून उमरगा कडे येत असताना लातूर गुलबर्गा मार्गावर बाबळसुर पाटीवर इनोव्हा कार व पिकअप टेंपो व आयशर ट्रकची तिहेरी धडक होऊन ईनोव्हा कार मधील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि . रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, मातोळा गावचे रहिवासी असलेले दत्तात्रय गोंविंद गिरी वय ३१ हे त्यांचे मित्र निखिल नामदेव भोसले यांच्या सोबत लातूर येथून उमरगाकडे इनोव्हा कार ने येत असताना लातूर गुलबर्गा मार्गावरील बाबळसुर पाटी वर समोरून येणाऱ्या पिकआप टेम्पोची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला.

यावेळी इनोव्हा कारच्या पाठीमागून येणारी आयशर ट्रकही दोन्ही वाहनावर येवून आदळली यात दत्तात्रय गिरी व निखिल भोसले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना घटनास्थळी उपस्थितांनी तात्काळ उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.तर इतर दोघे जखमी आहेत.शनिवारी दोन्ही मयतांचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्यांच्या मूळ गावी मातोळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR