22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबायडेन यांची निवडणुकीतून माघार

बायडेन यांची निवडणुकीतून माघार

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला कलाटणी
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये होणा-या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाने दबाव वाढविला होता. स्मृतीदोषाच्या कारणावरून त्यांनी माघार घेत असल्याचे अमेरिकन जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुकीला कलाटणी मिळाली आहे.

निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात प्रथमच थेट डिबेट आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ट्रम्प यांचा बायडेन यांच्यावर वरचष्मा पाहायला मिळाला. अशा स्थितीत बायडेन यांनी या शर्यतीतून माघार घ्यावी, अशी चर्चा अमेरिकेच्या राजकारणात सुरू झाली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन जनतेत त्यांच्याविषयी सहानुभूती वाढली. त्यामुळे माघार घेण्यासाठी बायडेन यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला होता. अखेर अमेरिकन जनतेला पत्र लिहून बायडेन यांनी रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. देश आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचे बायडेन म्हणाले.

कमला हॅरिस यांना पाठिंबा
जो बायडेन यांनी माघार घेत मूळ भारतीय असलेल्या कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कमला हॅरिस पक्षाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. या वर्षीच्या शेवटी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR