22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरबाल वयातच मूल्य रुजविण्यासाठी स्रेहसंमेलन

बाल वयातच मूल्य रुजविण्यासाठी स्रेहसंमेलन

अहमदपूर : प्रतिनिधी
स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगामध्ये परिवारातील सर्व सदस्य आपापल्या कामामध्ये अतिशय व्यस्त असल्याचे सांगून बाल वयामध्येच सांस्कृतिक मूल्य अंगी रुजविण्यासाठी शालेय स्तरावर स्रेहसंमेलन अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांनी केले.

दि.१० रोजी शनिवारी वार्षिक स्रेहसंमेलनात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशनराव बेंडकुळे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, नगरसेवक बालाजी आगलावे पाटील, संस्थेचे अध्यक्ष शंकराव अबरबंडे, सचिव मनिषाताई अबरबंडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला.

स्रेहसंमेलनात देशभक्तीपर गीते, भावगीते, भक्ती गीते, विठ्ठल गीते, शिवछत्रपती महाराजांची थोरवी, कोळीगीत, शेतकरी नाटिका, फॅन्सी ड्रेस, अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका, सर्वधर्मसमभावावर नाटिका आणि मनोरंजन् पर गीतावर चिमुकल्यांनी खूप सुंदर डान्स सादर केला आणि रशिकस्रोत्यांचे मने ंिजकले.अध्यक्षीय समारोप अ‍ॅड .किशनराव बेंडकुळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शंकरराव अबरबंडे यांनी तर सूत्रसंचालन एम. बी. गोरे, प्रवीण माने यांनी व आभार प्राचार्य ईश्वर पेटकर यांनी मांनले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR