24.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeसोलापूरबिकट परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्राचार्य पवार

बिकट परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्राचार्य पवार

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सात वर्षापासून गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दत्तक योजना राबविली जाते. या माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे विद्यार्थी उच्च पदावर जातील असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांनी केले.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने हुशार, होतकरू, गरीब विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत शिवस्मारक सभागृहात आयोजित शालेय साहित्य वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आर्यनंदी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर, समाजसेविका मंगल मर्दा, केअर हेल्थ इन्शुरन्सचे रिजनल हेड गौरव बेंद्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य पवार पुढे म्हणाले, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा हा विद्यार्थी दत्तक योजनेचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.यातून अनेक विद्यार्थी घडतील. मोठ्या पदावर जातील. या विद्यार्थ्यांनी स्थिरस्थावर झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांनाही मदत करावी. त्यातूनच एक ऋणानुबंध जपला जाईल आणि सामाजिक कार्याची एक शृंखला निर्माण होईल. सर्वांनी या उपक्रमास हातभार लावण्याची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून प्रतिष्ठानने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
प्रास्ताविक भाषणात संस्थापक महेश कासट यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. गेल्या सात वर्षापासून ही विद्यार्थी दत्तक योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येते. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या मुख्य उद्देशातून ही योजना प्रतिष्ठान राबवत असल्याचे सांगितले.
सुत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर आभार सुजाता सक्करगी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी.ए. सुमीत मर्दा, केशव भैय्या, संतोष अलकुंटे, प्रकाश आलंगे, महेश ढेंगले, बसवराज परचंडे, राजु कोकटे, गणेश येळमेली, दिपक बुलबुले, प्रथमेश कासार, अभिजीत व्होनकळस, दिपक करकी, श्रीपाद सुत्रांवे, दिनेश मंत्री, मयुर गवते, प्रसाद साळुंखे, महेश भाईकट्टी, नरसिंह लकडे, ज्योती कासट, रंजना ढेंगले, अक्षता कासट, भारती जवळे, शुभांगी लचके, अनिता रेळेकर, उमा मुंदडा आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यंदाच्या या सातव्या वर्षी इयत्ता ९ वी आणि १० वीतील एकूण ४१ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, कंपास, स्कूल बॅग, परीक्षा फी यासह शालेय साहित्य देण्यात आले. तर पहिली ते चौथीमधील २० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR