18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये महिला सरपंचाकडे मागितली खंडणी

बीडमध्ये महिला सरपंचाकडे मागितली खंडणी

बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणामुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्था चर्चेचा विषय असताना शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील महिला सरपंचाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. विकास कामासाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ममदापूर-पाटोदा गावातील तिघांनी महिला सरपंचाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी, अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात विकास कामे सुरू असताना, हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते. यादरम्यानच १६ ऑगस्ट २०२४ रोजी वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली. याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अधिक तपास अंबाजोगाई पोलिस करत आहेत..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR