बीड : प्रतिनिधी
आपल्याला पंकजाताईंना भेटून निधी आणायचा आहे, त्यासाठी मुंबईला जायचे आहे, असे म्हणून कळमअंबा (ता. केज) येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचे त्यांचा मित्र असलेल्या कारेगावचा माजी सरपंच दत्ता तांदळे याने अपहरण केले. पाटोदा येथे नेऊन एका खोलीत डांबले. त्याचा एक हात आणि एक पाय एकमेकांना बांधून पायात लोखंडी पट्टी ठोकून त्याला कुलूप लावले. इंगळे यांनी बांधलेली दोरी तोडून सुटका करुन घेतली. तांबा राजुरी येथे आल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना घेऊन थेट एसपी कार्यालय गाठले.
एकीकडे केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच अपहरण, हत्या प्रकरण गाजत असताना केजमध्येच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर इंगळे हे कळमअंबा येथील माजी सरपंच आहेत. दत्ता तांदळे हा कारेगाव येथील माजी सरपंच आपल्याला पंकजाताईंना भेटून २० लाखांचा निधी आणायचा आहे. त्यासाठी मुंबईला चलण्याचा आग्रह करत होता. १० टक्के कमीशन देऊन हा निधी आणायचा असे तो सांगत होता, असे ते म्हणाले.