29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरबीसीजी लसीकरण सुरु; ४४ हजार ज्येष्ठांना देणार लस 

बीसीजी लसीकरण सुरु; ४४ हजार ज्येष्ठांना देणार लस 

लातूर : प्रतिनिधी
क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने १८ वर्षांवरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत लातूर शहरामध्­ये सहा निकषात बसणा-या ४४ हजार  पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्­त बाबासाहेब मनोहरे आणि उपायुक्­त डॉ. पंजाब खानसोळे
यांच्­या मार्गदर्शनात आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर रतन भारती यांच्­या नियोजनानूसार लसीकरणासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सन २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने राज्य क्षयरोग विभाग राज्य लसीकरण विभाग व आयसीएमआर यांच्या वतीने बीसीजी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणे प्रौढासाठीही उपयुक्त्त ठरत आहे.
इतर आजाराविरोधातही लस परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. शहरातील  ४४ हजार लाभार्थीनी लस घेण्यासाठी संमती दिली आहे. ‘टीबी-बीन’ पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.  बीसीजी ही लस १८ वर्षांवरील व्यक्ती खालील ६ पैकी कोणतेही १किंवा अनेक निकष असलेल्­या व्यक्तीस देण्यात येणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे वैद्यकीय आरोग्­य अधिकारी डॉ. शंकर रतन भारती यांनी केले आहे. तसेच लसीकरणाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
लसीकरणसंदर्भात मनपा स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. क्षेत्र निहाय प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य आणि केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शहरातील ८ नागरी प्राथमिक आरोग्­य केंद्र व अंतर्गत आयुष्­मान नागरी आरोग्­य मंदिर स्­तरावर सदरील लस घेण्­याकरीताची सोय उपलबध आहे. तरी शहरातील पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. असे अवाहन आरोग्­य विभाग, महानगरपालिका, लातूर यांच्­यावतीने करण्­यात आलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR