28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeपरभणीबॅडमिंटन स्पर्धेत विद्या प्रसारणी शाळेचे यश

बॅडमिंटन स्पर्धेत विद्या प्रसारणी शाळेचे यश

पूर्णा : पूर्णा तालुका क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल मधील १७ वर्षातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला असून विजयी संघाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजयी संघाचे संस्थाध्यक्ष डॉ.दत्तात्रेय वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमराव कदम, श्रीनिवास काबरा, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विजयी संघातील खेळाडू सार्थक कदम, गंगाप्रसाद भिसे, सर्वेश विवेक कोंडेकर क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व सज्जन जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले. तालुका क्रीडा संयोजक धरमसिंह बायस, विवेक कोंडेकर, धनराज ठाकूर व क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे यांनी विजय संघाचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR